आर्थिक वर्षांची अखेर होत असून नागरिकांना विवरणपत्रे सादर करण्यासाठी शनिवार (३० मार्च) आणि रविवार (३१ मार्च) असे दोन दिवस शहरातील प्राप्तिकर कार्यालये सुरू राहणार आहेत.
३१ मार्चला यंदाच्या आर्थिक वर्षांची सांगता होत असून या आठवडय़ामध्ये २७ आणि २९ मार्च अशी दोन दिवस सुट्टी होती. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुढील दोन दिवस कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त टी. चाको मणी यांनी कळविले आहे.