पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

innova accident, pune mumbai highway, marathi news
यावेळी कारमधून एकूण चार जण प्रवास करत होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोयोटा इनोवा कारचा अपघात झाला. यात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. यात संदीपान भगवान शिंदे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष साहेबराव जगताप (वय ७०), किसन जठार (वय ७१ ) आणि मुक्ताराम किसन तावरे (वय ७१ ) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण बीडचे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एम एच- २३ ए के- ३८८८ या भरधाव वेगात असणाऱ्या टोयोटा इनोवा कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खालच्या बाजूला उतरली. त्यानंतर ही कार रस्त्याच्याकडेला असणाऱ्या झाडांना धडकून खोल नाल्यात कोसळली. यावेळी कारमधून एकूण चार जण प्रवास करत होते. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Innova accident on pune mumbai highway