जमाल सिद्धीकी यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आघाडी सरकारच्या काळात अधिकारी आणि राजकीय नेते ‘हमने लुटा, तुमभी लुटो’ या पद्धतीने भ्रष्टाचार करत होते, अशी टीका भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी िपपरीत केली. िपपरी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाका, असे आवाहनही त्यांनी केले.

िपपरीतील कामगार भवनात आयोजित अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी एजाज देशमुख, इम्रान मुजावर, सिकंदर शेख, अजिज शेख, सीमा सावळे, कुमार जाधव, नामदेव ढाके, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.

सिद्धीकी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सब का विकास’ हा नारा दिला आहे. भाजप अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात नाही.

केंद्र सरकारने अनेक योजना लागू केल्या, त्याचा लाभ मुस्लीम समाजालाही होत आहे. काँग्रेसकडून मात्र स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपवर खोटे आरोप केले जात आहेत. सरकारने लागू केलेल्या अनेक योजना िपपरी पालिकेतील सत्ताधारी अमलात आणत नाहीत, असे निदर्शनास आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अजिज शेख यांनी प्रास्तविक केले. कुमार जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamal siddiqui commented on government work
First published on: 16-05-2016 at 01:53 IST