मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मराठी चित्रपट परिवार’ तर्फे आयोजित चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये ‘खेळ मांडला’ हा सवरेत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘सतरंगी रे’ आणि ‘श्री पार्टनर’ या चित्रपटांनी पुरस्कारामध्ये वर्चस्व संपादन केले.
‘श्री पार्टनर’ साठी समीर सुर्वे यांना दिग्दर्शनाचा आणि पद्मनाभ िबड यांना अभिनयाचा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील अभिनेत्री श्वेता पगार आणि ‘धग’ मधील भूमिकेसाठी उषा जाधव यांना सवरेत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार विभागून देण्यात आला. अजय नाईक (सतरंगी रे) आणि क्षितिज वाघ (येडय़ांची जत्रा) यांना सवरेत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. गैरफिल्मी विभागामध्ये ‘तू मी’ आणि ‘पाऊस’ हे सागरिका कंपनीचे अल्बम पारितोषिकाचे मानकरी ठरले. ‘नकोशी’ अल्बमसाठी हर्षित अभिराज यांना संगीतकाराचा आणि केतकी माटेगावकर हिला गायिकेचा पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले आणि अभिनेता पुष्कर जोग याप्रसंगी उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीचे औचित्य साधून मराठी कलाकारांचा सहभाग असलेला नृत्य-संगीताचा विशेष कार्यक्रम सादर झाला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘खेळ मांडला’ ठरला सर्वात्कृष्ट चित्रपट
मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मराठी चित्रपट परिवार’ तर्फे आयोजित चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये ‘खेळ मांडला’ हा सवरेत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘सतरंगी रे’ आणि ‘श्री पार्टनर’ या चित्रपटांनी पुरस्कारामध्ये वर्चस्व संपादन केले.

First published on: 20-03-2013 at 01:59 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khel mandala gets award as a the best picture