पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीला अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक भागात आर्थिक फसवणुकीचे गुन्हा दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे न्यायालयामध्ये किरण गोसावीला हजर केल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे किरण गोसावीची आजची रात्र येरवडा कारागृहात निघणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये २०१८ मध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत असताना, आर्यन खान ड्रग्स प्रकरणावेळी पंच म्हणून किरण गोसावी राहिल होता. त्या दरम्यान त्याने आर्यन खान सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आर्यन सोबतची ती व्यक्ती कोण त्याचा शोध सुरू झाला असताना. त्यावेळी चिन्मय देशमुख यांनी पुणे पोलिसांकडे येऊन तक्रार केली की,आर्यन सोबत असलेल्या फोटो आर्थिक फसवणुक प्रकरणामधील आरोपीचा आहे. त्यानंतर पोलिसानी त्याचा शोध सुरू केला. अखेर २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज येथून त्याला अटक केली. 

त्यानंतर पुण्यासह राज्यात ९ ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी सध्या फरासखाना प्रकरण सुरू आहे. तर पुण्यातील लष्कर आणि वानवडी प्रकरण बाकी आहे. यामुळे किरण गोसावीच्या अडचणीत निश्चितच वाढ होणार असल्याचे बोले जात असताना. आज न्यायालयामध्ये किरण गोसावीला हजर केले असता अधिक माहितीसाठी गोसावीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांच्याकडे करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यावर किरण गोसावीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तसेच या सुनावणी दरम्यान लष्कर पोलीस स्टेशन मधील अधिकारी देखील उपस्थित होते. न्यायालयाचे आदेश येताच त्यांनी लगेच लष्कर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या आणखी एका गुन्हाबाबत पोलीसांनी त्याला अटक दाखवून त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. ती प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने किरण गोसावीला आजची रात्र येरवडा कारागृहात काढावी लागणार असून उद्या त्याला लष्कर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची शक्तता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran gosavi sent to yerawada jail financial fraud case srk 94 svk
First published on: 09-11-2021 at 17:47 IST