पुणे: भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काल समोर आल्यापासून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. अशातच पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये किरीट सोमय्या यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत ज्या जागी पडले होते ती जागा काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता तिवारी यांनी गंगाजल शिंपडून शुद्ध केली. तसेच यावेळी किरीट सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

शिवाजीनगर येथील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागील वर्षी तक्रार करण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी महापालिकेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतेवेळी किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये किरीट सोमय्या हे पायर्‍यावर पडले आणि त्यामध्ये ते जखमी देखील झाले होते. त्यावरून राज्यभरात भाजप विरुद्ध ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपचे राजकारण पाहण्यास मिळाले. हे आरोप प्रत्यारोपच राजकारण अद्यापही सुरूच आहे.

Loksabha Election 2024 Rahul Gandhi Rae Bareli poll Wayanad Amethi
रायबरेलीतूनही लढणे ही वायनाडची फसवणूक; डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर टीका
prajwal revanna case
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
Varsha Gaikwad met Congress leader Priya Dutt Mumbai
वर्षा गायकवाड यांचे पहिले सत्र मनधरणीचे
Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर

आणखी वाचा-आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : पुण्यात ठाकरे गटाच्या महिला सेनेकडून किरीट सोमय्यांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

दरम्यान भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काल समोर आला. त्यावरून राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात ठाकरे गटाच्या महिला सेनेमार्फत किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन ठाकरे गटाच्या महिला सेनेच्या शहर संघटीका सविता मते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या सर्व घडामोडीदरम्यान पुणे शहरातील काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी किरीट सोमय्या ज्या ठिकाणी पडले होते. त्या जागी गंगाजल शिंपडले आणि किरीट सोमय्या यांच्यासह भाजपमधील अनेक नेत्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

यावेळी संगीता तिवारी म्हणाल्या की, पुणे महापालिकेच्या सभागृहात महात्मा फुले यांच्यापासून अनेक नेत्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. या वास्तुमध्ये किरीट सोमय्या हे काही महिन्यापूर्वी आले होते. किरीट सोमय्या यांचा कालच्या व्हिडीओ समोर आल्याने, महापालिकेची वास्तू अपवित्र झाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या ज्या ठिकाणी आले आणि पडले ती जागा आम्ही गंगाजल शिंपडून शुद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-पुणे : प्रवाशांची गैरसोय टळणार, शिवाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत झाला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, भाजपमधील एकही नेता किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओबाबत अद्याप पर्यंत बोलत नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर भूमिका मांडतात. मग किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी या दोन महिला नेत्या गप्पा का? असा सवाल करीत, ‘आता शेळी का झाली?’ असा टोलादेखील यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

त्या पुढे म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांनी भाजपमधील अनेक महिलांच्या बाबतीत घाणेरडे शब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.