पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगमधील सहा आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. मुंढवा भागातील केशवनगर परिसरात ३० एप्रिल रोजी रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आकाश अशोक जावळे, सागर आकाश जावळे, साहिल भीमाशंकर सुतार, सनी विनायक चव्हाण, नागनाथ ऊर्फ हरी विठ्ठल पाटील, रोहित दत्तात्रय घाडगे यांना अटक करण्यात आली होती.

गायकवाड यांचा खून झाल्यानंतर मुंढवा-केशवननगर भागातील या घटनेचा निषेध करून बंद पाळला होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली होती. गायकवाड व्यावसायिक होते. त्यांच्या घराजवळ आरोपी शिवीगाळ, तसेच आरडाओरडा करत होते. आरोपींना गायकवाड यांना समजावून सांगितले. त्यानंतर आरोपी जावळे, सुतार, पाटील, घाडगे यांनी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – पुणे : जिल्हा परिषद भरती परीक्षेतील ‘या’ बदलामुळे हजारो उमेदवार अडचणीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायकवाड यांचा खून करणारे सहा आरोपी पोलीस कोठडीत आहेत. ज्या ठिकाणी आरोपींनी गायकवाड यांचा खून केला. त्या भागातून सहा आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. गुंडाची दहशत मोडीत काढण्यासाठी धिंड काढल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे, तसेच दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी दहशत माजविणाऱ्या गुंडांची माहिती पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले.