दागिने आणि रोख रक्कम असा पावणेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मोलकरिणीला गजाआड करण्यात आले आहे. १६ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत डेक्कन जिमखान्यावरील घरामध्ये हा प्रकार घडला आहे.
 शशिकला सिद्धराम हत्तुरे (वय ४६, रा. धायरेश्वर मंदिरामागे, विजापूर रस्ता, आयटीआयजवळ, महालक्ष्मीनगर, सोलापूर) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साधना प्रसाद गोडबोले (वय ४३, प्रसन्न, डेक्कन जिमखाना) यांनी फिर्याद दिली आहे. शशिकला ही गोडबोले यांच्याकडे घरकामास होती. साधना गोडबोले यांची नजर चुकवून देवघरातील कप्प्यामध्ये ठेवलेली किल्ली हस्तगत केली. या किल्लीच्या साहाय्याने कपाट उघडून त्यामध्ये ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकड आणि सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा पावणेचार लाख रुपयांचा ऐवज शशिकला हिने चोरला. डेक्कन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. साळुंके पुढील तपास करीत आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady house worker arrested against crime of theft
First published on: 11-09-2013 at 02:40 IST