मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली

बोरघाटात ठाकूरवाडी – मंकीहील दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

दरड कोसळल्याने वाहतूकीवर परिणाम

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी- मंकीहील दरम्यान संध्याकाळी रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. लोणावळा परिसरात दिवसभर पाऊस सुरू आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या डाऊन आणि मिडल लाईनवर सैल झालेल्या दरडी कोसळल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे – कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस बोरघाटात अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होत असून रात्री उशिरा दरड काढण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Landslide mumbai pune railway track

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या