पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील होती. प्रियदर्शनी वाघिणीचा वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणी संग्रहालया मधील प्रियदर्शनी वाघिणीने मागील दोन चार दिवसापासून काही खात नव्हती. त्यात तीच वय २१ होते,साधारण वाघ किंवा वाघिणीचे वय १६ ते १८ पर्यंत असते. यामुळे वाढत्या वयामुळे तिने खाणे सोडले असावे.त्यात तिचा आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी प्राणी संग्रहालयात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2021 रोजी प्रकाशित
पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्रियदर्शनी वाघिणीचा मृत्यू
प्राणी संग्रहालया मधील प्रियदर्शनी वाघिणीने मागील दोन चार दिवसापासून काही खात नव्हती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-10-2021 at 23:23 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lioness priyadarshini dies at rajiv gandhi zoo in pune zws