अर्थसंकल्पानंतरचे फायद्याच्या गुंतवणुकीचे गमक तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची पुणेकरांना संधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पातील तरतुदी बदलल्या. प्राप्तीकर टप्प्यांची रचना बदलली. भांडवली लाभावरील कराची मर्यादासंज्ञाही बदलली. हे सारे आपल्या बचतीच्या सवयीसाठी लाभदायक कसे करून घेता येतील? त्यासाठी कौटुंबिक अंदाजपत्रकही बदलावे लागेल काय? पारंपरिक गुंतवणुकीकडील सद्यस्थितीत कायम ठेवावा काय? बचतीला कोणत्या पर्यायात किती स्थान द्यावे? अशा अनेक प्रश्नांची उकल ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या निमित्ताने पुण्यात केली जाणार आहे. निमित्त आहे ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या नव्या वार्षिकांकाचे आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या गुंतवणूक मार्गदर्शनपर उपक्रमाचे!

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत व गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज सहप्रायोजक असलेले हे गुंतवणूक जागर येत्या रविवारी, ५ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स व जनकल्याण सहकारी बँक बँकिंग पार्टनर असलेल्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या चौथ्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात येईल.

गुंतवणुकीशी निगडित विविध विषयांवर तज्ज्ञ अर्थसल्लागारांचे पुणेकरांसाठी यावेळी मार्गदर्शन उपलब्ध होईल. यानिमित्ताने श्रोत्यांना गुंतवणुकीविषयीच्या शंकांचे उपस्थित तज्ज्ञांकडून निरसन करून घेता येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश खुला व विनामूल्य आहे. तसेच निमंत्रितांसाठी काही जागा राखीव आहेत.

वार्षिकांकात समाविष्ट करण्यात आलेल्या अर्थसकंल्पातील बदलत्या तरतुदींच्या सविस्तर विश्लेषणासह  प्रत्यक्ष तज्ज्ञ मार्गदर्शकांकडूनही अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक विशद केली जाईल.

गुंतवणूक आणि करबचत (सुहास कुलकर्णी), गुंतवणूक करण्यापूर्वी (भरत फाटक), शेअर बाजारात गुंतवणूक करताना (नीरज मराठे) व म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (अभय दांडेकर) आदी विषयांवर यावेळी सोदारणांसह, दाखल्यांसह मार्गदर्शन होईल. विविध गुंतवणूक पर्यायांचा परतावा, जोखीम या अंगानेही तज्ज्ञ यावेळी आपले विचार मांडतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arth brahma
First published on: 04-03-2017 at 02:53 IST