‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमांतर्गत पिंपरीमध्ये आज कार्यक्रम

गुंतवणूक, बचतीसाठी मार्गदर्शक असा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा गुंतवणूकपर मार्गदर्शन करणारा उपक्रम गुरुवारी (२० ऑक्टोबर) िपपरीत हॉटेल कलासागर येथे होत आहे. औद्योगिक सुटीचे औचित्य साधून तसेच सर्वाच्या सोयीसाठी गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागात हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमासाठी सर्वाना प्रवेश खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाणार आहे.

‘कोटक म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूक मार्गदर्शनाच्या यंदाच्या पर्वातील हे सत्र गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता िपपरीत कासारवाडीलगत हॉटेल कलासागर येथे होणार आहे. ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर ‘लोकसत्ता अर्थवृतान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये फंडाचे प्रकार, त्यातील परतावा, गुंतवणूक, फंड निवड आदींवर ते प्रकाश टाकणार आहेत. सनदी लेखाकार तृप्ती राणे या ‘अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आर्थिक नियोजनाच्या पद्धती, गुंतवणूक, बचत तसेच ठेवी, घर, जागा, सोने, चांदी यातील गुंतवणुकीविषयी त्या सविस्तर माहिती देणार आहेत. उपस्थितांना गुंतवणूक, बचतीविषयीच्या शंका विचारता येणार आहेत.

केव्हा, कुठे?

  • गुरुवार, २० ऑक्टोबर २०१६ सायंकाळी ५.३० वाजता
  • स्थळ : हॉटेल कला सागर,
  • पी-४, नाशिक फाटय़ाजवळ, जुना मुंबई-पुणे महामार्ग, पिंपरी, पुणे- ४११०३४

तज्ज्ञ मार्गदर्शक :

  • तृप्ती राणे (अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती)
  • वसंत माधव कुलकर्णी (म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे)