‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीतील पुस्तकांचा संग्रह

‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत प्रसिद्ध होत असलेल्या ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ या वैद्य हरिश पाटणकर यांच्या लेखमालेचा पहिला भाग असलेल्या ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

विविध आजारांवर घरगुती उपचार काय आणि काळजी कशी घ्यावी, याविषयी या लेखांमध्ये विवेचन करण्यात केले आहे. डोकेदुखी, पित्त, अल्सर, अ‍ॅलर्जी आदी विविध विषयांवरील जवळपास २५ लेखांचा पुस्तकात समावेश असून आजारांची कारणे आणि स्वरुपही वैद्य पाटणकर यांनी मांडले आहे. दर शनिवारी ही लेखमाला ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध होते. याच वेळी ‘आरोग्यवíधनी चिकित्सालया’तर्फे पाटणकर यांच्याच ‘केशायुर्वेद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच ‘आयुर्वेदीय हेअर टेिस्टग लॅब व संशोधन केंद्रा’चेही उद्घाटन करण्यात आले. ‘बी.व्ही.जी.इंडिया’चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, डॉ.दत्ताजी गायकवाड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण जामकर, डॉ. सतिश डुंबरे, डॉ. विजय डोईफोडे या वेळी उपस्थित होते.