पिंपरी-चिंचवड शहरालाही पावसाचा फटका बसला आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे जुन्या सांगवी परिसरात रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. या भागातले रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. मधुबन सोसायटी लेन १ ते १०, शितोळे नगर, मुळा नगर अशा अनेक भागांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

याचसोबत लोणावळ्यातील टाटा धरण भरल्याने इंद्रायणी नदीत आज सकाळपासून ३४० क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी आपली धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाला दिला आहे.