पुणे : उत्तर भारतातील अनेक राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये मोकाट, भटक्या आणि अशक्त जनावरांची संख्या जास्त आहे. याच अशक्त गोवंशात वेगाने लम्पी त्वचारोगाचा संसर्ग झाला. परिणामी उत्तर भारतात लम्पी त्वचारोगामुळे मोठय़ा प्रमाणावर पशुधन मुत्युमुखी पडले, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

 सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. पण, सर्वाधिक फटका राज्यस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातला बसला आहे. उत्तर प्रदेशातील बाधित आणि मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा अधिकृत आकडा मिळाली नाही.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

हेही वाचा >>> “अजित पवारांना मुख्यमंत्री करा” सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर, उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या…

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर विविध राज्यांनी गोवंश हत्याबंदी कायदे केले. त्यानंतर  काही जनावरे पांजरपोळ, गोशाळेत गेली. पण, या मोकाट, भटक्या आणि गोशाळेत दाखल झालेल्या भाकड जनावरांचे योग्य पोषण होऊ शकले नाही. त्यांना पुरेसा चारा मिळत नाही. उत्तर प्रदेशात तर क्षमतेहून कित्येक पटीने अधिक गोवंश  पांजरपोळांमध्ये आहे. ज्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, त्या जनावरांचे लसीकरण करण्याचे कष्ट कोण घेणार? अशा दुर्लक्षित, अशक्त जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग वेगाने झाला. मुळात जनावरे मोकाट असल्यामुळे आणि पांजरपोळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरे असल्यामुळे संसर्ग झाल्यानंतरही जनावरांना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा >>> “चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

नक्की झाले काय?

राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात गोवंशाची संख्या जास्त आहे. याच राज्यांनी २०१४ नंतर गोवंश हत्याबंदी कायदा करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून भाकड जनावरांच्या विक्रीवर बंधने आली. शेतकऱ्यांनी ही भाकड जनावरे मोकाट सोडून दिली. यातील कुपोषित, आजारी जनावरांमुळे रोगाचा प्रसार झाला.

आत्तापर्यंत परिणाम..

संबंधित राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार नऊ सप्टेंबपर्यंत संपूर्ण देशात ७० हजार १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय विचार करता राज्यस्थानमध्ये सर्वाधिक ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरातमध्ये ५३४४ आणि हरियाणात १८१० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

उत्तरेकडील राज्यांत गोवंश हत्याबंदी कायद्याचा परिणाम म्हणून भाकड जनावरे मोकाट सोडून देण्याचे प्रमाण अधिक आहे. या मोकाट आणि पांजरपोळांमध्ये मोठय़ा संख्येने असलेल्या जनावरांचे योग्य पोषण होत नाही. ही जनावरे  अशक्त होतात आणि रोगाला बळी पडतात. ‘लम्पी’बाबत, अशीच परिस्थिती उत्तर भारतात दिसून आली आहे.

विजय जावंधिया, शेती प्रश्नाचे अभ्यासक