लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून ११ वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० फेब्रुवारी ला ओम ला हरिपाठ आला नाही म्हणून आरोपी भगवान पोव्हणे याने त्याला काठी ने बेदम मारहाण केली. यात फुफ्फुस आणि हृदयाच्या मधोमध मार लागला. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथे कीर्तन असल्याने आरोपी पोव्हणे याने ओमसह सर्व मुलांना घेऊन त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर ओम ची तब्बेत बिघडली. महाराजांनी ओम ची आई कविता यांना फोन वरून मुलाची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले.

Heartfelt sorrow by Chhatrapati Shahu Maharaj, Rajavardhan Kadambande , Rajavardhan Kadambande calls himself Rajarshi Shahu s heir, Chhatrapati Shahu Maharaj give reply to Rajavardhan Kadambande, Kolhapur news, marathi news, rajashri shahu maharaj news, lok sabha 2024,
राजवर्धन कदमबांडे राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणवतात याचे मनस्वी दु:ख; छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिउत्तर
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
truck hit young mens carrying a flame on the occasion of Sacrifice Day
बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

तेव्हा, आई तातडीने त्या ठिकाणी गेली आणि मुलाला घेऊन आली. परंतु, प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याच्यावर कविता काम करत असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू केले. तो कोमात गेला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याच्या छातीचा एक्सरे काढण्यात आला त्यात त्याच्या छातीत पाणी झाल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा त्याला पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय. पाटील रुग्णालयात हलवले, त्याच्या छातीतून दोनशे मि.ली पाणी काढण्यात आले आहे. दरम्यान, तो अतिदक्षता विभागात असून ओम कोमात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भगवान महाराज पोव्हणे याच्यांवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला एका सप्ताह मधून अटक करण्यात आली आहे. ओमची प्रकृती बरी व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.