ऑनलाईन गेममध्ये पैसे लावण्यासाठी बुलेट चोरी करणाऱ्या आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच बुलेट विक्रीमध्ये सहभागी असलेल्या चार जणांना देखील अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुरेश खर्डे हा युट्युबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून चोरी करत असल्याचं पोलीस तपास निष्पन्न झाले आहे. चाकण पोलिसांच्या कारवाईमध्ये ११ बुलेट आणि इतर ७ दुचाकी जप्त केल्या आहेत.

हेही वाचा >>> ‘छत्री-रेनकोट विसरले म्हणून काय झालं आपल्याकडे जुगाड आहे ना!’, जुगाडू पुणेकर काकांचा Video Viral

अभय सुरेश खर्डे, रविंद्र निवृत्ती गव्हाणे, शुभम बाळासाहेब काळे, यश नंदकिशोर थुट्टे आणि प्रेम भाईदास देवरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अभय सुरेश खर्डे हा ऑनलाइन गेम खेळायचा. ऑनलाइन गेममध्ये अभय हा लाखो रुपये हरला होता. लाखो रुपये गेममध्ये हरल्याने तो बुलेट चोरीकडे वळला. युट्युबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून बुलेट चोरी करायला शिकला. अभय बुलेट चोरून मित्रांच्या मदतीने काही हजारात बुलेट विकत असे, मिळालेल्या पैशांमधून पुन्हा ऑनलाइन गेम खेळायचा. अखेर काही बुलेट चोरीची प्रकरण चाकण पोलिसात गेल्याने अभय च बिंग फुटल.

हेही वाचा >>> मोबाइलवरील मालिका बंद केल्याने मुलाकडून आईवर हल्ला- घरातील खिडकीच्या काचा फोडल्या; धनकवडीतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक सीसीटीव्हीत तो बुलेट चोरी करताना कैद झाला होता. चाकण पोलिसांनी तब्बल १५० पेक्षा अधिक सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध घेतला. फरार आरोपी अभय ला संगमनेरमधून सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ११ बुलेट, ७ इतर दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाडे, गणपत धायगुडे यांच्या टीम ने केली आहे.