फेसबुक लाईव्ह करत मारली तेराव्या मजल्यावरुन उडी; पुण्यात वेटरची आत्महत्या

हॉटेलमधील काही व्यक्तींनी माझं वाईट केले आहे. फसवून माझ्याकडून काही काम करुन घेतले आहे, असं तो म्हणत होता.

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील मुंढवा परिसरातील हॉटेल पेंटहाऊसच्या तेराव्या मजल्यावरुन फेसबुक लाइव्ह करीत एका वेटरने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अरविंदसिंह राठोड वय २६, रा. सनेती, उत्तराखंड असे आत्महत्या केलेल्या वेटरचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा असून महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला आला होता. मात्र महिनाभराच्या कालावधीत त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्यातून बुधवारी रात्रीच्या सुमारास अरविंदसिंह राठोड हा हॉटेलच्या टेरेसवर १३ व्या मजल्यावर गेल्यावर फेसबुक लाइव्ह केले.

मी आत्महत्या करणार असून हॉटेलमधील काही व्यक्तींनी माझं वाईट केले आहे. फसवून माझ्याकडून काही काम करुन घेतले आहे, असं तो म्हणत होता. हे पाहून त्याला अनेकांनी फोन केले. त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man jumps from 13th floor suicides in pune vsk 98 svk

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या