पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील शेळके आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सुनील शेळके यांनी नुकतंच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना आगामी लोकसभेच्या उमेदवारीवरून विरोध दर्शवला. याला श्रीरंग बारणे यांनी प्रतिउत्तर देत मावळमधील आगामी लोकसभेचा उमेदवार मीच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत प्रतिउत्तर दिल आहे. ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून डिवचले होते. बारणे यांना उमेदवारी न देता भाजपला उमेदवारी देण्यात यावी असं विधान करत त्यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या संदर्भात श्रीरंग बारणे म्हणाले, प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबत मीडिया वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी उमेदवारी ही गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठरलेली आहे. पुन्हा मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा बारणे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – १२४ गावांचा विकास एमएमआरडीएच्या हाती; ‘नवनगरा’साठी शासन निर्णय प्रसिद्ध, हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत

हेही वाचा – पत्नीला उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, आरोपीला बंगळुरू येथून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी २०२४ चा मावळ लोकसभेचा उमेदवार मीच असेल, असा ठाम विश्वासदेखील बारणे यांनी व्यक्त केला. कुठल्याही पक्षावर किंवा व्यक्तीवर मला बोलायचं नाही. त्यासंदर्भात चर्चा करायची नाही, असं म्हणत त्यांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याला महत्त्व दिलं नाही. महायुतीच्या जागांचा तिढा सुटत नाही. तोपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात कलगरीतुरा आणि आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडणार हे मात्र नक्की.