पुणे : राज्यातील व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या फेरीची निवडयादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १३ सप्टेंबर असल्याचे राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले आहे. सीईटी सेलने प्रवेश फेऱ्यांबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १३ सप्टेंबर आहे, तर ११ सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास शुल्काचा पूर्ण परतावा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती १३ सप्टेंबर रोजी भरावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.चौकट
असे असेल वेळापत्रक…
पहिल्या फेरीसाठी पसंतिक्रम नोंदणी : २६ ते २८ जुलै
पहिली निवडयादी जाहीर : ३१ जुलै
प्रवेश निश्चिती : १ ते ३ ऑगस्ट
दुसऱ्या फेरीच्या रिक्त जागा जाहीर : ४ ऑगस्ट
दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदणी : ५ ते ७ ऑगस्ट
दुसऱ्या फेरीची निवड यादी : ११ ऑगस्ट
दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश निश्चित करण्याची संधी : १२ ते १४ ऑगस्ट
तिसऱ्या फेरीच्या रिक्त जागा जाहीर : १६ ऑगस्ट
तिसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदणी : १७ ते १९ ऑगस्ट
तिसऱ्या फेरीसाठी निवडयादी जाहीर २२ ऑगस्ट
तिसऱ्या फेरीसाठी प्रवेश निश्चिती : २३ ते २५ ऑगस्ट
चौथ्या फेरीच्या रिक्त जागा जाहीर : २६ ऑगस्ट
चौथ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदणी : २८ ते ३० ऑगस्ट
चौथ्या फेरीसाठी निवडयादी जाहीर : १ सप्टेंबर
प्रवेश निश्चिती : २ ते ४ सप्टेंबर
रिक्त जागांवर संस्था स्तरावर प्रवेशाची प्रक्रिया : ६ ते १३ सप्टेंबर