scorecardresearch

निरंजन घाटे यांना म.सा.प जीवनगौरव ; किशोर बेडकिहाळ डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ लेखिका आणि भाषा अभ्यासक डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ जेष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांना जाहीर झाला आहे.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ लेखिका आणि भाषा अभ्यासक डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ जेष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांना जाहीर झाला आहे. वाड्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे किशोर बेडकिहाळ मानकरी ठरले आहेत.
परिषदेच्या ११६ व्या वर्धापनदिनानिमित्त २७ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतीळ, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, ‘निरंजन घाटे यांनी विविध विषयांवर १९८ पुस्तके लिहिली असून त्यातील १३० विज्ञानविषयक आहेत तसेच पाच हजार लेख लिहून मराठीतील विज्ञान साहित्याचे दालन त्यांनी समृद्ध केले आहे. उत्कृष्ट विज्ञानप्रसारक म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. लेखक, संपादक आणि विचारवेध संमेलनाचे संस्थापक असेलल्या किशोर बेडकिहाळ यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्यचळवळी गतिमान करण्यासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mca lifetime achievement award niranjan ghate dr kishor bedkihal honorary recipient bhimrao kulkarni karyakarta puraskar amy