पुणे : पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान भरती प्रक्रियेत १६७ उमेदवारांची निवड झाली आहे. पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमनपदी मेघना महेंद्र सपकाळ यांची निवड झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सध्या २५० जवान आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता अग्निशमन दलातील मनुष्यबळ अपुरे होते. महापालिकेने १६७ जवानांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेकडून जवान भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण अनिवार्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेघना सपकाळचे वडील महेंद्र अग्निशमन दलात कार्यरत आहेत. तिचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ अग्निशमन दलात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. अग्निशमन दलातील सेवेची परंपरा सपकाळ कुटुंबीयांत आहे. मेघनाने अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

हेही वाचा…कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक

महापालिकेकडून भरती प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर मेघनाने अर्ज केला. परीक्षा, तसेच पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या १६७ उमेदवारांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. महापालिकेने निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मेघना भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झाली. अग्निशमन दलात निवड झाल्याने पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी तिचे कौतुक केले.

अग्निशमन दलातील सेवेची सपकाळ कुटुंबीयांची परंपरा आहे. माझे आजोबा अग्निशमन दलातून निवृत्त झाले. माझे वडील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. मी आता माझ्या वडिलांबरोबर काम करणार आहे. माझी आई हयात नाही, ती असती तर तिला खूप आनंद झाला असता.– मेघना महेंद्र सपकाळ

हेही वाचा…राज्यात यंदा कांदा उत्पादन किती? जाणून घ्या अंदाज

मुंबईतील अग्निशमन दलात महिला

मुंबईतील अग्निशमन दलात महिलांची निवड करण्यात आली आहे. महिला आता सर्व क्षेत्रात कामगिरी करत आहेत. पोलीस, लष्करी सेवेत महिला असून, अग्निशमन दलात महिलांचे प्रमाण तसे कमी होते. मुंबईप्रमाणे आता पुणे अग्निशमन दलात महिला जवानांची भरती सुरू झाली आहे. मेघना सपकाळ पुणे अग्निशमन दलात निवड झालेली पहिली महिला ठरली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meghna mahendra sapkal chosen as first female firefighter in pune fire brigade pune print news rbk 25 psg
First published on: 21-02-2024 at 10:00 IST