पुणे : अन्न, वस्त्र याबरोबरच हक्काचा निवारा म्हणजेच घर आवश्‍यक आहे. रोजगारासाठी नागरिक शहरांत येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाकडून गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील सदनिकांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६०५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्जांची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा >>> पुणे : कोयता गँग पुन्हा सक्रिय; पर्वती पायथा भागात तरुणावर हल्ला

यातील २९३८ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. ३१२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले. म्हाडाच्या सोडतीमध्ये घरे मिळालेल्यांना त्याची माहिती नोंदणीकृत मोबाइलवर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस), ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे. तसेच म्हाडाच्या संकेतस्थळावरही ही घरे मिळालेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हाडा सोडतीचा आढावा

एकूण सदनिका ६०६८

एकूण प्राप्त अर्ज ५८ हजार ४६७

म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका २९३८२

२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे २४८३

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे ६३७