गणेश विसर्जन मिरवणूक काळामध्ये होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी येणारी आपत्ती विचारात घेऊन गणेशभक्तांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रविवार (२७ सप्टेंबर) आणि सोमवार (२८ सप्टेंबर) असे दोन दिवस डॉक्टरांचा चमू सज्ज असणार आहे.
फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात निरंजन सेवाभावी संस्थेने मिनी हॉस्पिटल उभारले आहे. यामध्ये पाच खाटा, सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन आणि सलाईन या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीकरिता दहा डॉक्टरांचा संघ सर्व यंत्रणेसह सज्ज आहे. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे जयेश कासट यांनी दिली.
आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टरांचे संपर्क क्रमांक
डॉ. जयप्रकाश राठी – ९८२२०२५१०३
डॉ. राधेश्याम लाहोटी – ९८५००६४२५०
डॉ. भूषण राठी – ९७३००४८२३३
डॉ. सुजाता राठी – ९७३००४८२३२
जयेश कासट – ८००७८८४४८३
विशाल सारडा – ९१६८२८७८६९
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2015 रोजी प्रकाशित
विसर्जन मिरवणुकीसाठी मिनी हॉस्पिटल
गणेशभक्तांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी दोन दिवस डॉक्टरांचा चमू सज्ज असणार आहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 26-09-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mini hospital in ganesh immersion period