पिंपरी : उद्योगनगरीतील औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षेला प्राधान्य देऊन घातक रासायनिक पदार्थांची हाताळणी करताना किंवा वाहतूक करताना आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, दुर्घटना घडल्यावर तातडीने त्यावर नियंत्रण मिळवता येण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रांच्या ठिकाणी आपत्कालीन सराव (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या औद्योगिक कंपन्यांसह भोसरी, तळवडे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आहे. त्यात रासायनिक वायुंचा वापर करणाऱ्या अपघातप्रवण औद्योगिक संस्थांचाही समावेश आहे. औद्योगिक परिसरात वायू गळती, रासायनिक आग लागणे अशा घटना घडल्यास काही वेळा आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) पाचारण करावे लागते.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

हेही वाचा…स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड देशात तेरावे, राज्यात तिसरे

मात्र, आपत्कालीन व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांशी समन्वय रहावा, यंत्रणा सतर्क राहाव्यात यासाठी आता शहरातील विविध औद्योगिक क्षेत्रांच्या ठिकाणी आपत्कालीन सराव घेतले जाणार आहेत. महापालिकेच्या निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीनचा वापर जलशुद्धीकरणासाठी केला असल्याने तेथे क्लोरीनचे सिलेंडर ठेवलेले असतात.

कोणत्याही ठिकाणी रासायनिक विषारी वायुगळती झाल्यास ती दुर्घटना कशा पद्धतीने हाताळावी, यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात आपत्कालीन सराव घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत हाताळणाऱ्या संलग्न यंत्रणांमध्ये समन्वय राहण्यासाठी हा सराव उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा…पिंपरी : नव्याने विकसित परिसराचा पाणीप्रश्न सुटणार, २०३१ ची लोकसंख्या गृहीत धरून महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे वरिष्ठ अधिकारी अजयकुमार यादव म्हणाले की, क्लोरीन अतिशय घातक वायू आहे. हवेपेक्षा जड वायू असल्यामुळे तो जमिनीवरच पसरतो. क्लोरीनचा वापर होत असलेल्या भागातील नागरिकांमध्ये वायुगळतीबाबत जनजागृतीची गरज आहे. वायुगळती होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. द्रव्य स्वरूपातील क्लोरीन आणखी घातक असून, हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यात चारपट वाढ होते. वायुगळती झाल्यास महापालिकेने शहरातील सर्व आपत्कालीन यंत्रणांसोबत समन्वय साधणे गरजेचे आहे.

वायुगळतीबाबत कृती आराखडा

वायुगळतीबाबत वेगवेगळा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. साहित्य सुरक्षितता माहिती पत्रक बनविणे खूप आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रशासकीय, औद्योगिक ठिकाणी वापरात येणाऱ्या घातक रासायनिक घटकांची संपूर्ण माहिती नमूद असायला हवी, असेही यादव म्हणाले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले की, औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांच्या ठिकाणी आपत्कालीन सराव घेतले जाणार आहेत. त्यामुळे जीवित आणि पर्यावरण हानी टाळली जाऊ शकते.