पुणे : दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये गेले पाच दिवस रखडलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर सहाव्या दिवशी भारतभूमीच्या दिशेने आगेकूच सुरू केली. पुढील ४८ तासांत मोसमी वारे आणखी प्रगती करतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्यांचा प्रवास पुन्हा जोमाने सुरू झाल्याने आता मोसमी पाऊस केरळमार्गे लवकरच भारतात प्रवेश करू शकणार आहे.

बंगालच्या उपसागरात १७ आणि १९ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली होती. मात्र, अरबी समुद्रात त्यांचा प्रवेश झाला नव्हता. अखेर २० मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात मोसमी वारे पोहोचले. त्यामुळे ते केरळच्या दिशेने वेगाने येतील, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच वातावरणात बदल झाला. पोषक स्थिती दूर झाली आणि मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला.

दक्षिण अरबी समुद्रात २० मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा प्रवास २५ मेपर्यंत थांबला. याच कालावधीत बंगालच्या उपसागराच्या दिशेनेही मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवासाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच हवामान विभागाने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरणाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार २६ मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांनी मोठी प्रगती केली. या भागात वारे मालदिव आणि कोमोरीनजवळ पोहोचले आहेत. बंगालच्या उपसागरातही त्यांनी प्रगती केली आहे.

दक्षिण अरबी समुद्रात २० मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा प्रवास २५ मेपर्यंत थांबला. याच कालावधीत बंगालच्या उपसागराच्या दिशेनेही मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवासाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच हवामान विभागाने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरणाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार २६ मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांनी मोठी प्रगती केली. या भागात वारे मालदिव आणि कोमोरीनजवळ पोहोचले आहेत. बंगालच्या उपसागरातही त्यांनी प्रगती केली आहे. पुढेही मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण असल्याने पुढील ४८ तासांमध्ये ते मालदिवसह, लक्षद्वीप परिसराजवळ दाखल होऊ शकतात, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात तुरळक भागांत पावसाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

र्नैऋत्य मोसमी पावसाने प्रवासाला पुन्हा सुरुवात केल्यामुळे समुद्रातून बाष्पाचा पुरवठाही होऊ लागला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील भागासह देशात विविध ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. महाराष्ट्रात विदर्भात काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दक्षिणेकडे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या भागांत पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्यांसह बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल आदी भागातही पाऊस होत आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.