पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तिसरी फेरी राबवली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन फेऱ्या राबवण्यात आल्या. आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा – धनकवडीतील अकरा गणेश मंडळांची शनिवारी प्रतिष्ठापनेची संयुक्त मिरवणूक

हेही वाचा – धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, की दरवर्षी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन ते चार फेऱ्या घेतल्या जातात. त्यानुसार आता तिसरी फेरी राबवली जाणार आहे. त्याबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना संधी देऊन प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.