भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी भाजपचे आमदार व  पिंपरीचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
alibag name change, rahul narvekar marathi news
राहुल नार्वेकरांवर अलिबागकर संतापले! अलिबागचे नाव बदलण्याच्या मागणीचा निषेध
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार लांडगे यांनी याबाबतचे निवेदन ठाकरे यांना दिले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या  हिंदू पंडितांवरील अन्यायावर भाष्य करणारा हा चित्रपट असून नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराची वास्तविकता या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांना चित्रपट पाहता यावा, यासाठी तो करमुक्त करावा. याआधी गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेशात हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी लांडगे यांनी निवेदनात केली आहे.