‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’तर्फे (एमटीडीसी) ६ जुलै रोजी पुण्यात एका दिवसाच्या वारी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. कात्रजपासून सुरू होणाऱ्या या सहलीत लोणंदला संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाविक व पर्यटकांना या सहलीत कात्रज ते लोणंद असा प्रवास करुन पालखीचे दर्शन घेऊन पुढे तरडगावपर्यंत वारीबरोबर राहता येईल आणि रात्री ९ पर्यंत सहल चांदणी चौक येथे परत येईल. ही सहल सशुल्क असून इच्छुक पर्यटक अधिक माहितीसाठी (०२०) २६१२६८६७ किंवा २६१२८१६९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करु शकतील, असे एमटीडीसीने कळवले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mtdc arraigning wari trip
First published on: 01-07-2016 at 05:37 IST