पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुठा कालवा गुरूवारी दुपारी फुटला असून यामुळे दांडेकर पुलावर पाणी आले आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. या घटनेत परिसरातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संतप्त नागरिकांनी महापौरांना घेराव घालत प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला.  यामुळे कालव्यातील पाणी परिसरात शिरले आणि अवघ्या काही वेळात परिसर जलमय झाला. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दांडेकर पुलावर पाणी आले असून यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. कालव्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या घटनेमुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. आता आम्ही करायचं, असा उद्विग्न सवाल नागरिक विचारत आहेत.

खडकवासला धरणातून कालव्यात होणारा विसर्ग थांबवण्यात आला असून नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून कालव्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. दांडेकर पुलाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि जलसंपदा विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. दुरुस्तीची प्रक्रिया लवकरच लवकरच सुरू करण्यात येईल, असे महापालिकेने कळवले आहे. या घटनेत ५० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mula river canal burst flood like situation at dandekar bridge in pune
First published on: 27-09-2018 at 12:05 IST