करोनामुळे तिन्ही ऋतूतील पर्यटनाला ब्रेकच लागला आहे. करोनामुळे सातत्यानं निर्बंध लागू केले जात असून, नागरिकांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहे. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर सरकारने निर्बंध लागू केले. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं निर्बंध शिथिल केले जात असून, लोक बाहेर पडताना दिसत आहे. पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात तर पर्यटकांना करोनाचा विसर पडल्याचं दृश्यं दिसून आली. भुशी डॅमच्या दिशने जाणाऱ्या हजारो नागरिकांना लोणावळा पोलिसांनी परत पाठवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी पंचस्तरीय धोरण अंवलंबलं आहे. रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्ही रेट कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले असून, मुंबई-पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी ई-पासची अट रद्द झाली. निर्बंध शिथिल होत असतानाच पावसाचं आगमन झालं. त्यामुळे घरात असलेल्या मुंबई-पुण्यातील नागरिकांनी वर्षा पर्यटनासाठी लोणावळा, भूशी डॅमकडे कूच केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune news monsoon tourism pune mumbai lonavala bhushi dam bmh
First published on: 13-06-2021 at 18:42 IST