प्रेयसीच्या चारित्र्याच्या संशयातून कात्रज घाटात खून

प्रेयसीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन पुण्यातील कात्रज घाटाजवळ असलेल्या बोगद्याजवळ प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे.

()

प्रेयसीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन पुण्यातील कात्रज घाटाजवळ असलेल्या बोगद्याजवळ प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सपना दिलीप पाटील रा.धनकवडी असे खून झालेल्या प्रेयसीच नाव आहे.तर राम गिरी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि राम हे दोघे रविवारी रात्रीच्या सुमारास एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेले होते.तेथून जेवण करून येत असताना.कात्रज बोगद्याजवळील कोळेवाडी इथे राम याने गाडी थांबविली. सपनाला काही समजण्याच्या आत राम याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्या घटनेत सपना रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिली.तेथून घटनास्थळावरून आरोपी राम पसार झाला.त्यानंतर जखमी अवस्थेत सपना हिला रूग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.तर आरोपी राम याला काही तासात ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिंहगड पोलिसांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Murder katraj ghat suspicion character beloved ssh 93 svk