फर्निचरचा व्यवसाय करणाऱया एका व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने खून केला. रफीक सत्तार शेख (वय ४५, रा. मिठानगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी कात्रज भागातील गोकूळनगरमधील रोहिदास मठाजवळ हल्लेखोरांनी शेख यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. हल्ल्यामध्ये शेख यांचा मृत्यू झाला. पोलिस याप्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेताहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2013 रोजी प्रकाशित
कात्रजमध्ये फर्निचर व्यावसायिकाचा निर्घृण खून
फर्निचरचा व्यवसाय करणाऱया एका व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने खून केला.

First published on: 15-03-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a businessman in katraj area