बाळालाच प्राधान्य! – शिल्पा शेट्टी

‘एका बाळाची आई असणे म्हणजे पूर्ण वेळ काम आहे. माझ्या १७ महिन्यांच्या बाळालाच माझ्या आयुष्यात प्राधान्य असून त्यामुळे येत्या दीड-दोन वर्षांत तरी मी चित्रपटांमधून दिसणार नाही.’

‘एका बाळाची आई असणे म्हणजे पूर्ण वेळ काम आहे. माझ्या १७ महिन्यांच्या बाळालाच माझ्या आयुष्यात प्राधान्य असून त्यामुळे येत्या दीड-दोन वर्षांत तरी मी चित्रपटांमधून दिसणार नाही,’ असे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सांगितले.
रांका ज्वेलर्सच्या सातारा रस्ता येथील दालनाचे शिल्पा हिच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ती बोलत होती. रांका ज्वेलर्सचे हे राज्यातील आठवे दालन आहे. पुखराज रांका, फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका आदि या वेळी उपस्थित होते.
शिल्पा म्हणाली, ‘‘मला खूप दागिने घालायला आवडत नाहीत. पण अंगठी, कर्णफुले आणि माझे ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’ हे दागिने नेहमी घालते. सोन्याचे दागिने खरेदी केले, तरी मी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करत नाही. सोने मोडायची कधी वेळही आली नाही. सध्या मी चित्रपट करत नसून टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये मला आनंद मिळतो आहे. मात्र चित्रपट निर्मितीचे काम सुरू आहे.’’ आगामी काळात ‘फिटनेस’विषयी लेखन करण्याची आपली इच्छा असल्याचे तिने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: My first preference is my child shilpa shetty