जात आणि धर्माच्या आधारावर कोणाची हत्या होणे हे माणुसकीला लांछनास्पद आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर याने नगरमधील दलित युवकाच्या हत्येचा निषेध केला. प्रेम करणे हा काही गुन्हा नाही. माणसाकडे माणूस म्हणून आपण कधी पाहणार, असा सवाल नानाने उपस्थित केला.
माणसामध्ये भेद करणाऱ्या या गोष्टीचे मूळ नष्ट व्हायला पाहिजे. कोणत्याही अर्जावर जात, धर्म असता कामा नये. धर्म घरामध्ये असावा. पण, एकदा घराबाहेर पडले की राष्ट्रालाच प्राधान्य असले पाहिजे, असेही नाना पाटेकर याने सांगितले. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन काय होणार? आपण कसे वागतो हे महत्त्वाचे आहे. या दलित युवकाच्या हत्येच्या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नानाने केली.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2014 रोजी प्रकाशित
जात, धर्माच्या आधारावर हत्या माणुसकीला लांछनास्पद – नाना
जात आणि धर्माच्या आधारावर कोणाची हत्या होणे हे माणुसकीला लांछनास्पद आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर याने नगरमधील दलित युवकाच्या हत्येचा निषेध केला.
First published on: 04-05-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar regrets murder of nitin aage