या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. सकाळी ७ च्या दरम्यानच त्यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचंही म्हटलं जातं आहे. तसंच विविध आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावर केले जात आहेत. अशात रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तसंच हा फोटो मी पोस्ट केला आहे कारण माझा तो हक्क आहे. माझ्यावर त्यासाठी कुणीही कारवाई करू शकत नाही. जर कारवाई करायचीच असेल तर भाजपाच्या गुंडांवर करा असंही रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

काय आहे रूपाली ठोंबरे पाटील यांची पोस्ट?

शुभ सकाळ

कसब्याचा नव्या पर्वाची ,कामाची सुरवात

आपला माणूस ,कामाचा माणूस.

कसबा मतदारांचा असं पोस्ट करत ईव्हीएममध्ये मतदान करतानाचा फोटो रूपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केला आहे. हा फोटो त्यांचाच आहे हे समजून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केली. त्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

रूपाली पाटील यांनी काय म्हटलं आहे?

या प्रकरणी रुपाली पाटील म्हणाल्या की, कसबा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.त्याच दरम्यान एका मतदाराने मला रविंद्र धंगेकर यांना मतदान केल्याचा फोटो शेअर केला.त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर आणि माझा व्हॉटस स्टेटस ठेवला.त्यावरून भाजपकडून टीका करण्यात येत आहे.पण मी अजून मतदान केल नाही. माझ्यावर जे आरोप करीत आहेत त्या व्यक्तीनी माझ्या मतदान केंद्रावर जाऊन पाहून यावे की मी मतदान केले की नाही. त्यामुळे मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. भाजपाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहण्यास मिळाल्या.ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना.आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.त्यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी रविवार पेठेतील मनपा शाळा क्र.९ मध्ये, तर महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी नू.म.वी शाळेत मतदान केल. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास श्रीमती नाथीबाई दामोदर ठकारसी कन्या शाळेत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक,कुणाल टिळक आणि कुटुंबीयांनी मतदान केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader rupali thombre post a facebook post about voting after so many she gave clarification and said svk 88 scj
First published on: 26-02-2023 at 13:10 IST