भोसरीत राष्ट्रवादीला खिंडार, वसंत लोंढेंचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी शहर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा िखडार पडले आहे. माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह भोसरी मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

रहाटणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यावेळी लोंढे, बोऱ्हाडे यांच्यासह माजी नगरसेवक घनश्याम खेडकर, आशा सुपे, प्रदीप तापकीर, सुनील लोखंडे, नीलेश नेवाळे, संजय पठारे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने आपल्याला पद देण्यापासून कायम वंचित ठेवले, आपला केवळ वापर करून घेण्यात आला, असा आरोप वसंत लोंढे यांनी केला. आमदार महेश लांडगे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत त्यांना पािठबा देत असल्याचे लोंढे यांनी सांगितले, तर खासदार श्रीरंग बारणे यांचे निकटवर्तीय नारायण बहिरवाडे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp vasant londhe join bjp bhosari cm devendrafadnvis nck

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या