यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ५८ खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातून राज्यसभेववर गेलेल्या राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र यावेळीही राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा वंदना चव्हाण यांनाच संधी देण्यात आली आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे.
राज्यसभेच्या ५८ रिक्त जागांमध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. यासाठी २३ मार्चला मतदान होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १२ मार्च असणार आहे. राष्ट्रवादीतर्फे पुन्हा एकदा वंदना चव्हाण यांना संधी दिली जाणार आहे. तसेच डी. पी. त्रिपाठी यांनाही राष्ट्रवादीतर्फे पुन्हा संधी दिली जाणार आहे.