पुणे : वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा ही प्रवेश परीक्षा १७ जूनला होणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ मेपर्यंत, ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी ७ मेपर्यंतची मुदत आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दोनशे गुणांच्या बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाच्या या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रावरील प्रश्नांचा समावेश असेल. देशभरातील ५४३ शहरे आणि देशाबाहेरील १५ ठिकाणी ही परीक्षा आयोजित केली जाईल. इंग्रजी, हिंदी, मराठी आदी तेरा भाषांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2022 रोजी प्रकाशित
‘नीट’साठीची नोंदणी सुरू, परीक्षा १७ जूनला
देशभरातील ५४३ शहरे आणि देशाबाहेरील १५ ठिकाणी ही परीक्षा आयोजित केली जाईल.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-04-2022 at 01:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet ug 2022 application process begins exam on july 17 zws