scorecardresearch

Premium

पुणे : महर्षीनगरमध्ये नऊ वाहने फोडली; स्वारगेट पोलिसांकडून एकास अटक

महर्षीनगर भागातून मध्यरात्री नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणास ताब्यात घेतले आहे.

RCF police chased arrested accused absconding eight years mumbai
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : महर्षीनगर भागातून मध्यरात्री नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणास ताब्यात घेतले आहे. ईश्वर सावणे (वय २०, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. सावणे मध्यरात्री महर्षीनगर भागातून निघाला होता. त्याला एकाने हटकले. त्यानंतर सावणे पुन्हा महर्षीनगर भागात आला. त्याने परिसरातील नऊ वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरु केला. सावणेला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

nagpur, Youth Arrested, Assaulting, Mother's Boyfriend, Victim Hospitalized, Head Injuries,
नागपूर : आईच्या प्रियकराची मुलाने केली धुलाई
Female accused in cyber crime
पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन
objectionable tapes
गडचिरोली : ‘हनीट्रॅप’ प्रकरणात आक्षेपार्ह चित्रफीत पोलिसांच्या हाती, पत्रकाराच्या…
Threat through message from Pakistan number at Poona Hospital in Navi Peth Pune news
पाकिस्तानच्या क्रमांकावरून संदेशाद्वारे धमकी; ‘कैदीयोको छोड दो, वरना…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nine vehicles smashed in maharshinagar swargate police arrested one pune print news rbk 25 ysh

First published on: 11-09-2023 at 22:22 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×