शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे (वय-८६) आज (शनिवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, मुलगी व नातवंड असा परिवार आहे. पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका व लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘वनस्थळी’ या संस्थेच्या त्या संस्थापिका होत्या. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी  काम केल. १९८१ ला त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना करुन महिलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि रोजगारासाठीच प्रशिक्षण यासाठी काम सुरू केलं. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केलं. ‘स्नेहयात्रा’ हे त्यांच प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असुनही त्यांनी आयुष्यभर स्वतच वेगळं व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली.  मागिल काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही अलिप्त होत्या. अखेर शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmalatai wife of shiv shahir babasaheb purandare passed away msr
First published on: 20-07-2019 at 21:11 IST