पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जूनला आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली. पालकांचे उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी  असलेल्या आणि आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षा देता येते. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी या दोन विषयांवर परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावी दरम्यान दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्तीच्या रुपात दिले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत, विलंब शुल्कासह १ मेपर्यंत आणि अतिविलंब शुल्कासह ६ मेपर्यंत शुल्क भरता येईल. परीक्षेबाबत अधिक माहिती  https://www.mscepune.in   या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.