पिंपरी : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार १८ जानेवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी रावेत येथील जलउपसा केंद्र गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महापालिकेमार्फत होणारा गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा : पुण्यातील ‘या’ भागात सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा; महापालिकेचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १९ जानेवारी रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित, कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसासाठा करून काटकसरीने वापर करुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.