वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती करावी लागणार असल्यामुळे या योजनेतून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (२० जून) बंद राहणार आहे. तसेच या भागांना शुक्रवारी (२१ जून) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. कळस (गणेशनगर), तसेच कळसचा काही भाग, धानोरी (भैरवनगर परिसर), लोहगाव परिसर, एअर फोर्स, लोहगाव विमानतळ, विमाननगरचा काही परिसर, खराडी, समर्थनगर, आपले घर परिसर, विद्यानगरचा काही भाग, सर्वेक्षण क्रमांक ११२, विश्रांतवाडी.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2013 रोजी प्रकाशित
वाघोली, खराडी, लोहगाव भागात उद्या पाणीपुरवठा नाही
वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती करावी लागणार असल्यामुळे या योजनेतून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (२० जून) बंद राहणार आहे.
First published on: 19-06-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water supply tomorow in wagholilohagaonkharadi