यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) डॉक्टरला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. गुरुवारी (१० नोव्हेंबर) ही घटना घडली.

तुषार ज्ञानेश्वर गव्हाणे (वय २९, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डॉ. उपलेश महाजन (वय ३०, रा. पिंपरी) यांनी या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गव्हाणे याची पत्नी गर्भवती आहे. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गव्हाणे पत्नीसोबत वायसीएम रुग्णालयात आला होता. त्यावेळी गव्हाणेने पत्नीची तपासणी करण्याची सूचना डॉ. महाजन यांना दिली. थोडा वेळ थांबा, असे डॉ. महाजन यांनी त्याला सांगितले. या कारणावरून त्याने डॉ. महाजन यांना मारहाण केली.