विविध उद्यानांत नागरिकांचा प्रतिसाद मात्र मोठा
पुणे : शहरातील विविध उद्यानात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असल्यामुळे खुल्या व्यायामशाळेसाठी (ओपन जीम) तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या साहित्याची खरेदी होणार आहे. मात्र महापालिके च्या मध्यवर्ती भांडार विभागाने साहित्य खरेदीसंदर्भात काही सूचना के लेल्या असतानाही दक्षता विभागाने पूर्वगणन समितीच्या बैठकीत निश्चित के लेल्या दरानुसार साहित्य खरेदीचा घाट घातल्यामुळे ही खरेदी वादात सापडली आहे.
शहरातील उद्याने, मोकळ्या जागांमध्ये नगरसेवकांकडून मोठय़ा प्रमाणावर व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे. काही ठिकाणी पदपथांवरही हे साहित्य बसविण्यात आले आहे. नागरिकांकडूनही या व्यायाम साहित्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असल्याचे चित्र आहे. खुली व्यायामशाळा ही संकल्पना पुढे आल्यानंतर बहुतांश ठिकाणी व्यायाम साहित्य बसविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत दहा कोटी रुपयांच्या साहित्याची खरेदी महापालिके कडून करण्यात आली आहे.
व्यायाम साहित्याच्या वापराला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे साडेचार कोटी रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. मात्र हे साहित्य कु ठे बसविणार, कु ठल्या भागात साहित्याची आवश्यकता आहे, याची कोणतीही माहिती या प्रस्तावात देण्यात आलेली नाही. त्यानंतरही हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी भांडार विभागाने ४ कोटी ५५ लाख रुपयांची निविदा काढली होती. मे. त्रिमूर्ती इंजिनिअरिंग या ठेके दाराने कमी दराने साहित्य पुरविण्याची तयारी दर्शविल्यामुळे त्याला काम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महापालिके कडून के ल्या जाणाऱ्या साहित्य खरेदीसाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना के ल्या आहेत. त्यानुसार जेईएम या संके तस्थळावर दिलेल्या दरानुसार साहित्याची खरेदी करावी, असे शासकीय आदेश आहेत. मात्र अशी खरेदी करण्याऐवजी महापालिके कडून स्वतंत्र निविदा काढण्यात आली. यापूर्वी खरेदी करण्यात आलेले व्यायाम साहित्य कु ठे बसविले, ते वापरात आहे की नाही, याची खातरमजा करावी, असा अभिप्रायही भांडार विभागाने दक्षता विभागाला दिला होता. मात्र त्यानंतरही दक्षता विभागाने के वळ पूर्वगणन समितीने निश्चित के लेल्या दरानुसार हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडून तो स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला.
या प्रक्रियेवर स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. त्यावर आक्षेपही नोंदविण्यात आले. मात्र नागरिकांकडून मागणी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
साहित्य खरेदीचा हिशेब नाही
गेल्या दोन वर्षांत महापालिके ने दहा कोटी रुपयांच्या साहित्याची खरेदी के ली आहे. भांडार विभागाकडून हे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे. साहित्य बसविताना आणि बसविल्यानंतर त्याबाबतची छायाचित्रे ठेके दाराने उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश देण्यात आले होते. मात्र छायाचित्र नसतानाही रक्कम दिली गेल्याचेही पुढे आले आहे. त्यावरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
व्यायाम साहित्याचे लेखापरीक्षण करण्याबरोबरच ते कोठे बसविण्यात आले आहे, याची यादी देण्याची सूचना करण्यात आली आहे. छायाचित्रही देण्यास संबंधितांना सांगण्यात आले असून जिओ टँगिंगही करण्यात येणार आहे.
– शांतनू गोयल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका