वाहन क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारे नवीन मोटार वाहन कायद्याचे विधेयक येत्या अधिवेशनात मांडले जाईल व ते मंजूर होताच तातडीने त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व जडवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भोसरीत बोलताना दिली. आपल्याकडे एका चालकाकडे चार-चार परवाने असतात, यासंदर्भात आश्चर्य व्यक्त करतानाच गडकरी यांनी, खोटी फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या प्रकाराला आळा बसवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
सीआयआरटीच्या वतीने सुरू केलेल्या ‘आयडीटीआर’ उपक्रमाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, संजयकाका पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर शकुंतला धराडे, केंद्रीय सचिव संजय बंडोपाध्याय, ‘सीआयआरटी’चे अभय दामले, टाटा मोटर्सचे संजय बोरवणकर, संजीव गर्ग, महापालिका आयुक्त राजीव जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, उपलब्ध आकडेवारीनुसार  देशात दरवर्षी साडेपाच लाख अपघात होतात, त्यामध्ये एक लाख ४० हजार जणांचा मृत्यू होता. चार लाख विकलांग होतात. अशा अपघातांमध्ये चालकांना जबाबदार धरले जाते. इतर देशात चालक परवाना मिळणे अवघड असते. मात्र, आपल्याकडे एकेकाकडे चार परवाने असल्याचे आढळून आले आहे. हे चित्र बदलले पाहिजे, अपघातांची संख्या कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी चालकांचे प्रशिक्षण व परीक्षण महत्त्वाचे आहे, त्यासाठी नवीन कायदा उपयुक्त ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of idtr by nitin gadkari
First published on: 03-11-2014 at 03:25 IST