सवलती कायम राहण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : महापालिके कडून टाळेबंदीसंदर्भातील सुधारित आदेश बुधवारी जाहीर के ले जाणार आहेत. पोलिसांबरोबर बैठक घेऊन हे आदेश काढले जाणार आहेत. टाळेबंदीमधील निर्बंध कठोर होण्याची शक्यता कमीच असून सवलतीही कायम राहणार आहेत. पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला असून त्या दृष्टीने के वळ प्रतिबंधित क्षेत्राची फे ररचना करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने टाळेबंदीच्या सहावा टप्पा ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे. ज्या शहरात जास्त रुग्ण आहेत, त्या शहरांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्याचे अधिकार राज्य शासनाने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिके कडून शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन बुधवारी सुधारित आदेश काढले जाणार आहेत.

शहरातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे टाळेबंदीचे नियम कठोर के ले जाणार नाहीत. प्रतिबंधित क्षेत्राची फे रचना करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व सवलतीही कायम ठेवल्या जातील, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येने नियमितपणे पाचशेची संख्या ओलांडली आहे.

मात्र शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापालिके कडून करण्यात आला आहे. करोनाबाधित रुग्णांची तातडीने तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट हे उपकरणही महापालिके ला प्राप्त झाले आहे. त्यामुळे करोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order regarding lockdown today zws
First published on: 01-07-2020 at 02:44 IST