PCMC Elections 2017: पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच रस्सीखेच 

निकालानंतर शिवसेना नेमका कोणाला पाठिंबा देणार हे पाहावे लागेल.

pcmc
पिंपरी चिंचवड महापालिका

मंगळवारी (दि.२१) पिंपरी चिंचवडमधील दिग्गज नेते मंडळींचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. १२७ जागांसाठी ७७३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १६०८ मतदान केंद्रावर मतदान झाले आहे. या मध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात रस्सीखेच होणार आहे. शिवसेना निकालानंतर नेमका कोणाला पाठिंबा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपली प्रतिष्ठापणाला लागलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे, भाऊसाहेब भोईर, सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असणारे आर.एस.कुमार, राजू मिसाळ, महापौर पदाचे दावेदार वसंत लोंढे, अजित गव्हाणे, नाना काटे, आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रशांत शितोळे, माजी आमदार विलास लांडे यांचे पूत्र विक्रांत लांडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजप: आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय सारंग कामतेकर, शिवसेनेतून आलेल्या सीमा सावळे.
शिवसेना: शहराध्यक्ष राहुल कलाटे, गटनेत्या व विधान सभेच्या दोन वेळेच्या उमेदवार सुलभा उबाळे, खासदार श्रीरंग बारणे यांचा पुतण्या नीलेश बारणे, माजी खासदार गजानन बाबर यांच्या भावजय शारदा बाबर, मारुती भापकर.
काँग्रेस: सचिन साठे
रिपाइं (आठवले गट): चंद्रकांता सोनकांबळे
अपक्ष: भाजपचे बंडखोर नवनाथ जगताप, राष्ट्रवादी बंडखोर प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजप पुरस्कृत झामाबाई बारणे, राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजप पुरस्कृत ज्योती ओव्हाळ.
या सर्वांचे नशीब हे सध्यातरी मतदान यंत्रात बंद झाले आहे. नेमकं कोण बाजी मारणार आणि कोणाचं नशीब खुलणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pcmc elections 2017 pimpri chinchwad municipal election ncp bjp congress

ताज्या बातम्या