पुणे : शहरासह जिल्ह्य़ातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून इतर ठिकाणची सेतू, महा-ई-सेवा आणि आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रे सुरू करण्याला मंगळवारी मुभा देण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रसृत के ले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांनी १७ मार्चला सेवा केद्रे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असल्याने ही सेवा केंद्रे सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

सद्य:स्थितीत ३० जूनपर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र, विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सेतू, महा-ई-सेवा व आधार केंद्रे शासनाच्या आदेशानुसार शारीरिक अंतर राखून प्रतिबंधित क्षेत्रे वगळता पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या सेवा केंद्रांमधील सामग्री, उपकरणे व संबंधित परिसराचे र्निजतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे. केंद्र चालक व इतर तंत्रज्ञ यांनी स्वच्छता विषयक सर्व आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे.
केंद्रांमध्ये काम करताना चालक व इतर कर्मचाऱ्यांनी, तर येथे येणाऱ्या नागरिकांनी मुखपट्टी वापरणे बंधनकारक आहे. अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

काही प्रमुख अटी

* केंद्र चालक किं वा कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाणे किं वा अशा भागातून प्रवास करण्याला मनाई

* कामाची वेळ आरक्षित के ल्याशिवाय आणि खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही

* प्रतिबंधित क्षेत्रातील भागातील सेवा केंद्रे बंदच राहतील

* शहरासह जिल्ह्य़ात आधार नोंदणी शिबिरांना बंदी